श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे. 


नव‍वर्ष स्वागतयात्रा २०२४, ठाणे 






गुढी-पाडवा 

मंगळवार, ९  एप्रिल  २०२४.  


येणारे वर्ष 

विक्रम संवत २०८१,  शके १९४६, 

क्रोधीनाम-संवत्सर

Indian New Year Swagat-Yatra 2024, Thane. 


२४ व्या नव‍वर्ष सोहळ्याच्या संकेत-स्थळावर आपणा सर्वांचं मन:पूर्वक स्वागत !

स्वागताध्यक्ष  : 

श्री. अर्जुन देशपांडे 

(तरुण उद्योजक - जेनेरिक फार्मा व्यवसायाचे जनक)

अध्यक्ष  : श्री. उत्तम जोशी     कार्याध्यक्ष : श्री. संजीव ब्रह्मे          कार्यवाह : डॉ. अश्विनी बापट 

निमंत्रक  :  श्री. तनय दांडेकर - 8898259883   

सह निमंत्रक  :  श्री. विनीत अश्रित - 9869860371                          

                        श्री. निखिल सुळे - 9819233345   

राम मंदिर ते राष्ट्र मंदिर

 भारतीय संस्कृती एक वैभवशाली परंपरा

चैत्र शुद्ध प्रतिपदा,   शके १९४६,  विक्रम सवंत २०८१,  क्रोधीनाम संवत्सर 

 मंगळवार, दिनांक ९ एप्रिल  २०२४ रोजी सकाळी ७.00 वाजता 

ठाण्याची भारतीय नववर्ष स्वागत यात्रा ! 

श्री शिवराज्याभिषेक वर्ष ३५० वे

स्वागतास या सत्वर क्रोधीनाम जरी संवत्सर 

प्रेमे सकलांचा महासागर व्यापून राहो धरणीवर


विश्वधर्म जोपासणारी सुवर्णयात्रा.


मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ सकाळी ७.00  पासून

 आकर्षक चित्ररथांनी सजलेली विविध वेशभूषांनी नटलेली तरुणाई व आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त सहभागाने चैतन्यमय झालेली ठाणेकरांच्या नव्या उर्मी आकांक्षा व स्वप्नांना आकार देणारी, 


           धर्म, ज्ञाती, समाज, भाषा, प्रदेश, देश, राजकारण      या सार्‍यांपलीकडे जाऊन  सर्वांना एकत्र जोडणारी . 


 नववर्ष स्वागत यात्रा २०२४


 सकाळी ६ .४५ वा. छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्यास वंदन.

 सकाळी ७.00  वा. श्री कौपीनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान.



आपल्या पारंपारिक वेषात आणि साजात नववर्षाचे स्वागत करण्यास 

स्वागत यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा

सर्व ठाणेकर आणि अन्य नागरिकांना हार्दिक आमंत्रण !  

नम्र निवेदन 


मान‍निय महोदय  / महोदया,

"श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास' ही संस्था ठाणे शहरातील सांस्कृतिक चळवळीत कार्यरत असणारी संस्था असून, संस्थेच्या माध्यमातून गेल्या २ वर्षापासून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. ठाणे शहरातील सर्व धर्मीय एकत्र येऊन अतिशय उत्साहात व जल्लोषात ही स्वागत यात्रा साजरी करतात. प्राचीन  भारतीय संस्कृती व परंपरा जतन करणारा हा भारतीय नववर्ष स्वागताचा सोहळा असतो.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही "श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासा"तर्फे,  चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्याचे योजलेले असून, मंगळवार, दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.00 वाजता ठाणे शहरात निघणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथ शिंदे, हे प्रतिवर्षीप्रमाणे स्वागतयात्रेत पहिल्यापासून सहभागी होणार आहेत. यावर्षी आपल्याला स्वागताध्यक्ष म्हणून  श्री. अर्जुन देशपांडे (तरुण उद्योजक जेनेरिक फार्मा व्यवसायाचे जनक) लाभलेले आहेत.  

"राम मंदिर ते राष्ट्र मंदिर भारतीय संस्कृती एक वैभवशाली परंपरा""श्रेष्ठ भारत"  या विषयांवर आधारित आपली स्वागतयात्रा असणार आहे.

मंगळवार, दिनांक ९ एप्रिलला सकाळी ठीक ७.०० वाजता श्रीकौपीनेश्वर पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल. प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभळी नाका- रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील. त्यावेळी तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपआपल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचे रुपांतर भव्य अशा स्वागतयात्रेत होईल. ही स्वागतयात्रा पुढे आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल. त्यानंतर, पुढे राममारुती मार्ग, पु. ना. गाडगीळ चौक, तलाव पाळी मार्गे पुन्हा श्री कौपिनेश्वर मंदिरात येईल. मंदिरात आरती व प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.

या निमित्ताने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम व इतर उपक्रमांविषयी माहिती पुढीलप्रमाणे:

सांस्कृतिक कार्यक्रम : कौपीनेश्वर प्रांगण

रविवार, दिनांक ७ एप्रिल २०२४ : सायं. ५.३० ते ८ :  ठिकाण - श्री कौपीनेश्वर मंदिर प्रांगण.

 नृत्यधारा  :

सादरकर्ते  : ठाण्यातील विविध नृत्य संस्था. 

रविवार, दिनांक ७ एप्रिल २०२४ :  सायं. ८.३० ते १०.०० वा. :  ठिकाण - श्री कौपीनेश्वर मंदिर प्रांगण.

दशावतार नाटक :

 सादरकर्ते :  ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ ट्रस्ट.

 

 सोमवार, दिनांक ८ एप्रिल २०२४ :  सायं. ७.३० ते ८.१५ वा.  :  ठिकाण - मासुंदा तलाव.

 दीपोत्सव :     

 मासुंदा तलावाच्या परिसरात हजारो दिव्यांचा दीपोत्सव स्वातंत्र्य देवता आणि गंगा आरती.


सोमवार, दिनांक ८ एप्रिल २०२४ : सायं. ६.०० ते ७.००  :  ठिकाण श्री कौपीनेश्वर मंदिर प्रांगण.

 महिला पौरोहित्य वर्गाचे रुद्र पठण :

 सादरकर्ते : राष्ट्रसेविका समिती महिला पौरोहित्य वर्ग.

 

सोमवार, दिनांक ८ एप्रिल २०२४ : सायं. ८.३० ते ९.००   :  ठिकाण - श्री कौपीनेश्वर मंदिर प्रांगण.

 नांदी :

 सादर करते  :  ठाणे भारत सहकारी बँक, ठाणे. 


सोमवार, दिनांक ८ एप्रिल २०२४ : सायं. ९.१० ते ९.५०   :  ठिकाण - श्री कौपीनेश्वर मंदिर प्रांगण.

 श्री शिवराज्याभिषेक नृत्य नाटिका  :

 सादरकर्ते :  कलांकुर आर्ट फाउंडेशन. 


 दिनांक ५ एप्रिल ते १० एप्रिल २०२४  :   ठिकाण - १९ नं. शाळा, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे.

 रंग रामायण  :

 राम चरित्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन

 संकल्पना :  वेद कट्टी रंगवली परिवार, ठाणे. 


 दिनांक ७ एप्रिल ते ९ एप्रिल २०२४  :  ठिकाण - श्री कौपीनेश्वर मंदिर प्रांगण. 

 फोटो सर्कल आयोजित फोटो प्रदर्शनी व ऐतिहासिक आरमार प्रदर्शन.

 


मंगळवार, दि. ९ एप्रिल  २०२४  : सकाळी ७.००  ते १०.०‍०  : स्वागत यात्रा  ( यात्रा मार्ग ) 

 कार्यक्रमास रोज साधारण ३५० ते ५०० रसिकांची उपस्थिती असणार आहे.  गुढीपाडव्याच्या स्वागत-यात्रेत अधिकाधिक ठाणेकरांची उपस्थिती अपेक्षित आहे.



 अन्य सांस्कृतिक उपक्रम :


स्वागतयात्रेचे भूतपूर्व स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी मागील वर्षी स्वागतयात्रेचे घोषगीत तयार केले आहे. ते गीत आणि त्याची रिंग-ट्युन संकेतस्थळावर मुक्त वापरासाठी उपलब्ध आहे.    घोषगीत ऐकण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.  


www.swagatyatrathane.org   (Search words :  swagatyatra  thane 24     ghoshgeet)  /   swagatyatrathane@gmail.com  

स्वागतयात्रेमध्ये ज्युपिटर रुग्णालयाचा वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहे, जिथे तातडीची आणि तात्कालिक वैद्यकिय सेवा उपलब्ध असेल.  यात्रेच्या मार्गामधे दोन ठिकाणी रुग्णवाहिका त‍त्पर  असतील.  

यावर्षी स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहतील.

'संस्कार भारती' या संस्थेतर्फे गावदेवी मैदान येथे १० हजार चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात येणार आहे. 

स्वागतयात्रेच्या दिवशी, "सेल्फी विथ स्वागतयात्रा", फोटोग्राफी स्पर्धा" फोटो सर्कल सोसायटीतर्फे, तर पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ स्पर्धा श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत.

या यात्रेमध्ये आपण, आपली संस्था, आपलं गृह-संकुल, शाळा, इत्यादिंसकट, इतर कार्यकर्त्या समवेत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक विषय घेऊन सहभागी व्हावे, अशी आपणास विनंती करतो. तसेच पूर्वसंध्येला कौपीनेश्वर मंदिराच्या प्रांगणात सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाला सुद्धा आवर्जुन उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.


आपले नम्र  :  

नव‍वर्ष स्वागत-यात्रा आयोजक मंडळ २०२४ 

कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे.


⚜️ निमंत्रण ⚜️ 🚩


सस्नेह नमस्कार,


कौपीनेश्वर संस्कृती न्यास द्वारा आयोजित,


हिंदू नववर्ष शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला  सोमवार दिनांक ८ एप्रिल  २०२४  रोजी मासुंदा तलाव परिसरातील विसर्जन घाट येथे संध्याकाळी ६.३० वाजता  "गंगा आरती" चे आयोजन करण्यात आले आहे.


 आपणांस आणि आपल्या समाज बांधव बंधू -भगिनी यांस या आरतीसाठी सादर निमंत्रित करीत आहोत.


मासुंदा तलाव परिसरातील विसर्जन घाट येथे पारंपारिक वेषभूषेत आवर्जून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.    

ही नम्र विनंती. 🙏


कौपीनेश्वर  सांस्कृतिक न्यास, ठाणे.


गंगा आरती संपर्क  -

सुशांत फाटक 9769918605

स्वप्नील मायदेव 9987847573

ढोल ताशांचा गजर, लेझीमचा ठेका,ठिकठिकाणी रांगोळीचे सडे,पुष्पवृष्टी, विविध विषयांचे चित्र रथ, पारंपारिक वेषात नटून आलेल्या महिला आणि तरुण-तरुणी, अपार उत्साह आणि बरंच काही ......

पुन्हा एकदा अनुभवुया.👍🏼😊

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील स्वागतयात्रे मधे महिलांची Bike / Scooter Rally आयोजित केली आहे त्यामधे महिला पारंपरिक वेषात  सहभागी होऊया.

चला तर मग आपण सगळ्याजणी नव्या उत्साहात आणि चैतन्यात.

 मंगळवार,  दि.९ एप्रिल २०२४ रोजी,   सकाळी ठिक ६:३० वा.

ठिकाण:- श्रीनाथ रसवंती गृह शेजारी, गडकरी रंगायतन जवळील चौक

टिप : - यावर्षीपासून प्रत्येकीने आपापल्या फेट्याची  व्यवस्था स्वतः करायची आहे.


7 वर्षापूर्वी बनवलेली कौपिनेश्र्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागतयात्रा ची संपूर्ण व्हिडीओ क्लिप .

ही क्लिप बघून तुम्हाला अंदाज येईल की आपली स्वागतयात्रा व पूर्वसंध्येला कसे कार्यक्रम असतात ह्याचा अंदाज येईल.

भारतीयत्व  म्हणजे  धर्म, ज्ञाती, समाज, भाषा,  प्रदेश,  या सार्‍यांपलिकडे  जाऊन  सर्वांनी एकत्र येऊन  जगणे.  असा  ‘विश्वधर्म’  जोपासण्यास प्रोत्साहित करणार्‍या ह्या भारतीय नव-वर्ष स्वागत-यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं हीच अपेक्षा !

नववर्ष  स्वागतयात्रा, ठाणे : घोषगीत

   नभी निनाद गुंजले.

नवीन वर्ष जन्मले.

 “विश्व-मान्य, विश्व-दीप भारत

आत्मनिर्भर, सशक्त भारत"

चला  घडवूं या रे समर्थ भारत || 


परंपरेत मिसळुनी  नवे विचार रे,

एकसाथ चालू या सुवर्ण-मार्ग  रे.

देश-प्रेम जन-मनी ज्वलंत राहू दे.

विश्वधर्म आपुला दिगंत होऊ दे.

 बलसागर देश ख्यातकीर्त होऊ दे.

 काल अमृताचा समूर्त होऊ दे.

विक्रमी, भविष्यवेधी भारत

विकास-श्री, प्रगल्भ-श्री भारत

चला  घडवूं या रे समर्थ भारत ||"

      डॉ.  विनोद  इंगळहळीकर

Kopnishwar Pamplate 2024.pdf

कार्यालय : श्री कौपीनेश्वर मंदिर, जांभळी नाका, ठाणे. 

कार्यालयीन वेळ : सायं ६ ते ८:३०  


E-Mail : swagatyatrathane@gmail.com  Website : www.swagatyatrathane.org

                                                 Instagram   


Facebook

स्वागत-यात्रेचे संकेत स्थळ सौ. ज्योती सावंत ह्यानी डॉ. विनोद इंगळहळीकरांच्या मार्गदर्शनाखाली केले  आहे.